Harivanshachi Bakhar Athava Patwardhan Sardaranchya Hakikati | हरिवंशाची बखर अथवा पटवर्धन सरदारांच्या हकीकती

Harivanshachi Bakhar Athava Patwardhan Sardaranchya Hakikati | हरिवंशाची बखर अथवा पटवर्धन सरदारांच्या हकीकती
मिरज येथे एका गृहस्थाच्या घरची जुन्या रद्दीची पोती चाळीत असतो आम्हास प्रस्तुत बखरीचे दहा बारा फुटकळ बंद मिळाले. ते वाचून पहाता त्यात बऱ्याच चुका दिसून आल्यावरून एकंदर बखरींविषयी आमचा ग्रह प्रतिकूल झाला व ऐतिहासिक- लेखसंग्रहात एका स्थळी आम्ही तो तसा नमूदही करून ठेविला आहे. तथापि ही सबंध बखर मिळविण्याविषयी आमचा उद्योग चालूच होता. तो उद्योग सफल होऊन तिगस्ता ही सबंध बखर आमच्या हाती लागली. ती वाचून पाहिल्यावर आमचा पूर्वीचा अग्रह बदलला व असे दिसून आले की, यद्यपि या बखरीत चुका पुष्कळ आहेत तरी हीतली प्रत्येक आख्यायिका अगदी सोळा आणे नसली तरी बहुतेक अंशी तात्पर्यतः खरी आहे व पुरंदर प्रकरणींच्या वगैरे आख्यायिका तर अक्षरशः खऱ्या आहेत. त्यावरून पेशवाईच्या इतिहासाचे यथार्थ ज्ञान होण्यास या बखरीचा काही उपयोग होईल