Hasanyavari Neu Naka | हसण्यावारी नेऊ नका

Hasanyavari Neu Naka | हसण्यावारी नेऊ नका
गोगलगायीवर बसलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवर जवाहरलाल नेहरू चाबूक उगारतायत अस दाखवणार शंकर यांच १९४९ सालच व्यंगचित्र एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट होत,त्यावरुन २०१२ साली बराच गदारोळ उडाला, दलितांनी या विरोधात निषेध नोंदवला आणि कलात्मक स्वातंत्र्याच्या निकषावर सर्वांनी या निषेधाचा प्रतिकार केला. त्यानंतर अभ्यासक व व्यंगचित्रकार उन्नमाटी श्याम सुंदर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रांमधील आंबेडकरांच्या व्यंगचित्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली. या प्रयत्नातून भारतातील आघाडीच्या प्रकाशनांमधल्या शंभरहून अधिक व्यंगचित्रांच एक संकलन तयार झाल. शंकर, अन्वर अहमद व आर.के.लक्ष्मण इत्यादी व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्र आहेत. आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या चित्रांमधून उघड होतो. प्रत्येक व्यंगचित्रासोबत केलेल्या धारदार भाष्यामुळे आंबेडकरांसारख्या ऎतिहासिक अन्याय सहन केलेल्या माणसाच वास्तविक चरित्रही उजेडात येत.