Hasarya Reshetun Hasavinyachya Palikadale | हसऱ्या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले

Hasarya Reshetun Hasavinyachya Palikadale | हसऱ्या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले
जगभरच्या हास्यचित्रकारांशी मधुकर धर्मापुरीकरांचा परिचय घडून आला तो लहान वयातच. यामधून निर्माण झालेल्या हौशीमधून हास्यचित्रं जमवण्याचा, त्यांचा संग्रह करून ठेवण्याचा छंद जन्माला आला. अशा जमा झालेल्या जगभरच्या हजारो हास्यचित्रांनी त्यांची या कलेविषयीची जाण जोपासली, वृद्धिंगत केली.काही चित्रं निव्वळ हसवण्यासाठी असतात; तर काही हसवता हसवता जीवनविषयक गंभीर पण सूचकतेनं भाष्य करणारी असतात. याचा त्यांना प्रत्यय आला आणि मग या सूचक अर्थाचा खोलवर शोध घ्यायचा त्यांचा नाद वाढीला लागला.धर्मापुरीकरांचा आस्वादप्रक्रियेचा दीर्घकाळचा प्रवास या लेखसंग्रहामधून शब्दबद्ध झाला आहे. हसविणाऱ्या रेषांतून आकृतिबद्ध केलेलं हसविण्याच्या पलीकडलं रहस्य संवेदनाक्षम निरीक्षणातून आणि प्रौढ समजातून नोंदवणार्या या लेखांमुळं हास्यचित्ररसिकाची जाण समृद्ध व्हायला मदत होईल.