Hasawa Phaswi |हसवा फसवी

Hasawa Phaswi |हसवा फसवी
ज्येष्ठ रंगकर्मी श्री. दिलीप प्रभावळकर यांनी लिहीलेले हसवा फसवी हे नाटक म्हणजे नटानं स्वतःसाठी लिहिलेली ही संहिता. आपल्यातल्या अभिनेत्याला, अभिनयाला वाव मिळावा म्हणून रचलेली पण त्यात नुसतच अभिनय दर्शन न राहता तो एक आगळावेगळा निखळ आणि निर्भेळ करमणुकीचा नाट्यप्रकार झाला. एक नव्या प्रकारचं नाटक म्हणून त्याची दखल घेतली गेली. "हसवा फसवी चा प्रयोग पाहणे ही एक उच्च दर्जाची निखळ करमणूक तर आहेच पण ज्यांना 'अभिनय' या कलेबद्दल आस्था आहे त्यांच्या दृष्टीने तर दिलीप प्रभावळकरांचा हा प्रयोग पाहणे म्हणजे एक आदर्श वस्तुपाठच आहे. ह्या नाट्यप्रयोगाचे बारकाईने सुक्ष्मतेने अवलोकन करणे म्हणजे अभिनय कले संबंधीचा एक वर्षभराचा अभ्यासक्रम पूरा करण्यासारखे आहे असे नटश्रेष्ठ कै. डॉक्टर श्रीराम लागू यांचे मत होते."