Hati Jyanchya Shunya Hote | हाती ज्यांच्या शून्य होते

Hati Jyanchya Shunya Hote | हाती ज्यांच्या शून्य होते
हे माहीत आहे का तुम्हाला, अब्राहम लिंकन हे आधी पोस्टमास्तर होते; द ग्रेट शेक्सपिअर खाटिकखान्यात नोकरी करीत असे; गुलजार मोटार गॅरेजमध्ये काम करायचे आणी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूरच्या कोर्टात शिपाई होते. थोर गायक सुधीर फडके यांचा चहा-भाजीचा व्यावसाय होता. प्रख्यात चित्रपट अभिनेते निळू फुले यांनी ११ वर्षे माळीकाम केले होते तर चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी मुंबईच्या फुटपाथावर सिनेमाची पोस्टर्स रंगविण्याचे काम केले होते. अथक परिश्रमाने, परिस्थिती शी झगडत, दारिद्र्याचे चटके सोसत त्यांनी विश्र्व निर्माण केले. या आणि अशा मोठ्या व्यक्तींच्या रोमांचकारी आयुष्याची माहिती या पुस्तकातून मिळते. या सगळ्यांनीच शून्यातून विश्व घडविले.