Healthy Ranbhajya | हेल्दी रानभाज्या
Healthy Ranbhajya | हेल्दी रानभाज्या
दरवर्षी ठराविक काळात रानात नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या रानभाज्यांपैकी काही विशिष्ट ऋतुपुरत्या मर्यादित असतात, तर काही वर्षभर येणाऱ्या असतात. आहारातून रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी या भाज्या अत्यंत उपयोगी ठरतात. परंतु, रानभाज्यांचा नेमका कोणता भाग उपयोगात आणायचा याचे एक खास तंत्र आहे. आदिवासींच्या जीवनाचा अपरिहार्य भाग असलेल्या या रानभाज्या रोजच्या जीवनात कशा वापरायच्या, त्यांचे औषधी उपयोग, मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्यांची लागवड कशी करावी, प्रत्येक रानभाजीची आदिवासी करीत असलेल्या पाककृती याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक.