Helkave | हेलकावे

Helkave | हेलकावे
अमेरिकास्थित लेखक श्री. अतुल केळुसकर यांचा 'हेलकावे' हा दुसरा कथासंग्रह आहे. 'अकल्पित' हा गेल्या वर्षी निघालेला त्यांचा पहिला कथासंग्रह, पण या दोन्ही कथासंग्रहांत त्यांचा नवखेपणा आढळत नाही. दोन्ही कथासंग्रह लक्षवेधी झाले आहेत. आता प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या 'हेलकावे' या कथासंग्रहातील कथा या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारित अशाच आहेत, त्यामुळे लेखकाचे निरीक्षण अचूक असल्याचे जाणवते. त्यांच्या ‘अकल्पित' या कथासंग्रहाप्रमाणे या कथासंग्रहातील कथा वाचताना त्यात मन गुंतून जाते. याचबरोबर प्रसिद्ध होणारा तिसरा कथासंग्रह 'झोके' हाही लक्षवेधी झालेला आहे. याचे कारण श्री. केळुसकर यांचे त्यांच्या लेखनातील कसब हे आहे. श्री. केळुसकर यांचे वास्तव्य अमेरिकेत असूनही त्यांच्या लेखनातील मराठी भाषेचा गोडवा वाखाणण्यासारखा आहे. त्यामुळे कथा वाचताना मन अधीर होऊन वाचतच राहावे असे वाटते. त्यांची भाषाशैली उत्तम आहे. वाक्ये छोटी छोटी असल्यामुळे वाचायला बरे वाटते. ती वाचत असताना मराठीतील प्रसिद्ध कथालेखक म. ल. डोकळ यांची आठवण होते. श्री. अतुल केळुसकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !