Himalayachi Savali |हिमालयाची सावली

Vasant Kanetkar | वसन्त कानेटकर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Size guide Share
Himalayachi Savali ( हिमालयाची सावली by Vasant Kanetkar ( वसन्त कानेटकर )

Himalayachi Savali |हिमालयाची सावली

Product description
Book Details
Book reviews

‘…या नव्या नाटकात तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला हे फार बरे झाले. वाईट आणि चांगले यांच्या संघर्षापेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष अधिक नाजूक असतो. तो रंगविणेही कठीण असते. पण मराठी कथा, नाटक, कादंबरी यांनी आता या वाटा चोखाळल्या पाहिजेत. असे नाटक आपोआपच उत्कट स्वभावनिष्ठ होते. त्यामुळे नाट्याचा कृत्रिमपणा कमी होतो. ड्रिंकवॉटर, शेरवुड वगैरेंच्या लिंकनवरल्या नाटकांत हा अनुभव मी घेतला आहे. "या नाटकाच्या अनुषंगाने सुचलेला एक विचार मी तुमच्यापुढे मांडतो. चरित्रात्मक नाट्य किंवा कादंबरी लिहिणे ही एक प्रकारची कसरत आहे. मूळची माणसे घेतली की कल्पिताला रचनाकौशल्याला आणि संस्कारसामर्थ्याला मर्यादा पडतात. तुम्ही नावे माणसांची नाती व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलल्या आहेत. तरी तेवढ्याने फार मोठा बदल घडून येत नाही. मूळच्या माणसाच्या संबंधितांच्या हळव्या भावनांना अकारण जपावे लागते. अशा वेळी ज्या चरित्रापासून आपल्याला आशयसंपन्न विषय मिळत असेल त्याचा आत्मा तेवढा कायम ठेवून बाकीचे सारे मूळ चरित्रापासून दूर नेणे अधिक हितकारक होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर काहीही असो. वृद्ध नायक व नायिका यांच्याभोवती गुंफलेली कथानके आपल्याकडे फार थोडी असतात. त्या दृष्टीने तुमचे नाटक एक नवीन पायंडा घालीत आहे. रामचंद्रांची सीता आणि तुकारामाची जिजाई यांचे मिश्रण असलेली नायिका सुदैवाने तुम्हांला लाभलेली आहे. तिचे चित्रण तुम्ही फार कौशल्याने केले आहे…..”" #NAME?

ISBN: 978-8-17-185707-4
Author Name:
Vasant Kanetkar | वसन्त कानेटकर
Publisher:
Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
115
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest
Male Characters :
8
Female Characters :
3

Recently Viewed Products