Himalaywasi Guru Ani Atindriya Shakti | हिमालयवासी गुरु आणि अतींद्रिय शक्ती

Himalaywasi Guru Ani Atindriya Shakti | हिमालयवासी गुरु आणि अतींद्रिय शक्ती
एका हिमालयवासी गुरुंनी विश्वविद्यालयात शिकणार्या एका तरूणाला बीजमंत्र दिल्यानंतर दोन वर्षांनी एका मध्यरात्री तो तरूण उठून बसला. त्याला जाणवल की, त्याव मन हे दूरच्या जागा आणि माणसांशी जोडल जातय. भेदरलेल्या आणि भांबावलेल्या या तरूणाला लक्षात आल की, त्याच्या अंतर्ज्ञानाची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एवढच नाही तर ब्रह्मांडातून काही गूढ आवाज त्यांच्या मेंदूत प्रवेश करत आहेत हेही त्याला जाणवल. मनाची रहस्य, ध्यान आणि संन्यासी यांचा वेध घेत त्याच आयुष्य कायमस्वरूपी पालटल. अनेक हिमालयी गुरू चमत्कारिकरित्या त्याला मार्गात भेटत होते आणि विविध टप्प्यांवर त्याला मार्गदर्शन करीत होते. दोन दशक ध्यानाच्या माध्यमातून स्वत:च्या मेंदूच निरीक्षण केल्यानंतर, मनाचा एक एक पदर हळूहळू बाजूला सारत एके दिवशी त्याने विलक्षण मानसिक शांततेचा उदय होत असल्यात अनुभवल. शेवटी हा प्रवास एका चिरंजीव संन्याशाच्या चरणाशी येऊन पोहोचला.