Hindi Chitrapatgeet : Parampara Ani Avishkar | हिंदी चित्रपटगीत : परंपरा आणि आविष्कार

Hindi Chitrapatgeet : Parampara Ani Avishkar | हिंदी चित्रपटगीत : परंपरा आणि आविष्कार
लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असे हिंदुस्थानी संगीताचे ढोबळ प्रकार मानता येतात. त्यांपैकी सुगम संगीताचाच म्हणता येईल असा एक संगीतप्रकार, जो गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढलेला आहे, तो म्हणजे चित्रपट संगीत. भारतीय; विशेषतः हिंदी चित्रपटांतील गीतांनी भारतीय संगीतात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. संगीताकडे मोकळ्या आणि उदार दृष्टीने पाहणाऱ्या अशोक दा. रानडे यांना या संगीताचे महत्त्व समजू शकले. हिंदी चित्रपट गीतांनी भारतीय संगीताच्या वारशात घातलेली मोलाची भर त्यांना जाणवली आणि म्हणूनच त्याचा गांभीर्याने अभ्यास करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. या अभ्यासाचे फलित रूप म्हणजे ‘हिंदी चित्रपट गीत : परंपरा आणि आविष्कार’ हे पुस्तक. "या पुस्तकात रानडे यांनी हिंदी चित्रपट संगीताच्या घडणीच्या; म्हणजेच १९४६ पासून ते १९८० पर्यंतच्या गीतांचा संगीताचा अभ्यासपूर्ण ऊहापोह केला आहे. चित्रपट संगीतात कालानुरूप होत गेलेले बदल त्यावर असलेला भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा प्रभाव प्रो. बी. आर. देवधरांपासून ते खेमचंद प्रकाश नौशाद एस डी बर्मन आर डी बर्मन ते अगदी अलीकडच्या ए आर रहमानपर्यंत वेगवेगळ्या संगीतकारांची वैशिष्ट्ये त्यांच्या गाजलेल्या गीतांची वैशिष्ट्ये रानडे यांनी रसाळपणे उलगडून दाखवली आहेत."