Hindu : Jagnyachi Samrudh Adgal | हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ

Bhalchandra Nemade | भालचंद्र नेमाडे
Regular price Rs. 518.00
Sale price Rs. 518.00 Regular price Rs. 575.00
Unit price
Hindu : Jagnyachi Samrudh Adgal ( हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ ) by Bhalchandra Nemade ( भालचंद्र नेमाडे )

Hindu : Jagnyachi Samrudh Adgal | हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ

About The Book
Book Details
Book Reviews

हिंदू या कादंबरीला 2014 सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला.कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली. आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृतीची' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. "या संस्कृतीचा सगळा पसारा अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार' 'हूल' 'जरीला' 'झूल' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे." "मुखपृष्ठावरचे सुभाष अवचट यांचे उत्कृष्ट पेंटिंग पुठ्ठा बांधणी उत्तम छपाई ही या कादंबरीची बाह्य वैशिष्ट्ये म्हणता येतील."

ISBN: 978-8-17-185412-7
Author Name: Bhalchandra Nemade | भालचंद्र नेमाडे
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 603
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products