Hindutva Ani Rashtriyatva | हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व

Hindutva Ani Rashtriyatva | हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व
हे पुस्तक लिहिण्या मागे लेखक आपली भूमिका मांडताना म्हणतात.. 'हिंदुत्ववादातला ग्राह्यांश आत्मसात करून घेतलेला हिंदी किंवा भारतीय राष्ट्रवाद असे माझ्या प्रयत्नाचे स्वरूप आहे. पण केवळ कृत्रिमपणे समन्वय घडवून आणावा असा माझा हेतू नाही. परिस्थितीचा आणि विविध भूमिकांचा यथाशक्य अभ्यास करून मला जे निष्कर्ष काढावेसे वाटले ते मी मांडीत आहे. हे केवळ तात्त्विक विवेचन आहे. त्याच्या संदर्भात प्रचलित संस्था, संघटना वा राजकीय पक्ष यांच्या ध्येय-धोरणांत काय पालट होणे अवश्य आहे याची चर्चा येथे केलेली नाही. तसा पालट होण्याची शक्याशक्यताही मी अजमावलेली नाही. तो सगळा पुढच्या अभ्यासाचा विषय आहे. सर्व भारतीयांना आपण एक आहोत, जगातल्या इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपण आपले ऐक्य टिकवून धरले तरच जागतिक स्पर्धेत टिकून राहू, राष्ट्रीय हित हेच आपले धोरण असले पाहिजे-असे वाटू लागले म्हणजे राष्ट्रीय भावना साकार झाली असे म्हणता येईल.'