Hinsecha Pratishodh | हिंसेचा प्रतिशोध

Hinsecha Pratishodh | हिंसेचा प्रतिशोध
औद्योगिक क्रांती आणि तिच्यामुळे निर्माण झालेले यंत्रावलंबित्व, यांमुळे मोठ्या प्रमाणात माणसांचा हिंसेकडे कल वाढू लागला. यंत्रावलंबी युद्धे, वसाहतीकरण आणि वैश्वीकरण यांमुळे हिंसा आणि लालसा यांना इतिहासात कधी नव्हे एवढा आश्रय मानवी आचार-विचारात मिळाला. एके काळी भयावह समजली गेलेली हिंसा आजकाल सर्वसामान्य जीवनाचा भागच समजली जाऊ लागलेली आहे. "प्रस्तुत लेखांतून लेखकाने आपले विचार अनुभव आणि कृती यांविषयीचे सखोल चिंतन समाविष्ट केलेले आहे. हिंसेविषयीचे एक महत्त्वाचे भाष्य आणि हिंसेविरुद्ध असणारी ‘रचनात्मक कृती ’ यांमुळे प्रस्तुत लेखसंग्रह प्रेरक झाला असून त्याच्या वाचनाने या जगातली हिंसा कमी करता येऊ शकेल हा विश्वास वाचकाच्या मनात नक्की जागृत होईल. " "हिंसेचा प्रतिरोध या ग्रंथातील लेखन हिंसेच्या स्रोतांचे तात्त्विक विश्लेषण करते. वेळोवेळी लिहिलेल्या लेखांतून लेखकाने पश्चिम भारतातील आदिवासी जमातींमधील तंटेबखेडे दंगेधोपे आणि अलीकडे लेखक-कलावंतांनी उभारलेले विद्रोहाचे निशाण यांविषयीचे विचार प्रस्तुत लेखसंग्रहात संकलित केलेले आहेत. विद्वेष दहशत आणि हिंसा यांना निर्भयपणे करावयाचा विरोध यांचे आग्रही प्रतिपादन या लेखनात समाविष्ट आहे. " "समाजशास्त्र राज्यशास्त्र भाषाशास्त्र तत्त्वज्ञान महात्मा गांधींच्या अहिंसावादी कृती यांचे आचरण करणार्यांना या ग्रंथाद्वारे अनमोल विचारधन प्राप्त होणार आहे."