Hiranyagarbh : Kahani Bramhandnayakachi | हिरण्यगर्भ : कहाणी ब्रह्मांडनायकाची

Hiranyagarbh : Kahani Bramhandnayakachi | हिरण्यगर्भ : कहाणी ब्रह्मांडनायकाची
कोट्यावधी लोकांच्या श्रद्धा आणि भक्तीचे स्थान असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे लेखकांना भावलेले परब्रह्म स्वरूप आणि त्यातून स्वान्त सुखाय घडलेला हिरण्यगर्भ हा कादंबरी रूप अविष्कार आहे. ही एक अध्यात्मिक गाभा असलेली अनेक साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांच्याभोवती गुंफलेली काल्पनिक कादंबरी आहे. लेखक म्हणतात स्वामींचा भूतलावरील भौतिक तसेच सूक्ष्मात वावर हा साधारण ७३० वर्षे इतका दीर्घ होता, जो योगीराज यांच्या भोवती गुंफलेल्या कथा या स्वरूपात येथे साकारला आहे. ही कादंबरी स्वामींच्या गूढ व्यक्तिमत्त्वाची अनुभूती वाचकांना नक्कीच देईल असे लेखकांना वाटते.