Hirave Rawe | हिरवे रावे

Hirave Rawe | हिरवे रावे
जी. ए.च्या कथांत साकार झालेला ध्यास हा एका संमिश्र, यातनागाढ व्यक्तिमत्त्वाने घेतलेला ध्यास आहे. या ध्यासात रूढ सामाजिक जाणिवेला अवसर नाही. सामाजिक मूल्ये व संदर्भ म्हणजे एक भयावह, हास्यास्पद गुंतागुंत आहे असाच जी. ए.चा प्रकट अभिप्राय दिसतो. सामाजिकता हा नियतीच्या क्रूर खेळाचा केवळ दृश्य भाग आहे. जी. ए.चे भावसाफल्य या भयावह गुंतवळीतच आहे. ही गुंतवळ जीवघेणी ठरते. ती तिच्या निरर्थकतेमुळे. या निरर्थकतेची शापित, जहरी छाया अवघ्या मानवजातीला व्यापून दशांमुळे उरते. या कथेचे दुसरे ध्यानात येणारे वैशिष्ट्य म्हणजे कथा हलकी, विरविरीत पोताची वाटत नाही. ‘गिधाडे’, ‘तुती’, ‘बाधा’ अशा काही गाजलेल्या कथा या संग्रहात वाचायला मिळतील.