Hoy Mi Stree Ahe! | होय मी स्त्री आहे!

Hoy Mi Stree Ahe! | होय मी स्त्री आहे!
भारतातील पहिल्या तृतीयपंथीय प्राचार्य म्हणून मनोबी बंदोपाध्याय यांनी पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील कृष्णनगर महिला महाविद्यालयाची सूत्रे 9 जून 2015 रोजी हाती घेतली. हे पद त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर मिळाले आहे. आपल्या समाजाला त्यांचे हेच सांगणे आहे- ‘शिका जर आपण शिकलो, तरच आपल्या समस्या सुटतील. ’त्यांनी बंगाली साहित्यात डॉक्टरेट मिळवली आहे. झारग्रामच्या विवेकानंद शतवार्षिकी महाविद्यालयात त्यांनी ‘बंगालीच्या सहयोगी प्राध्यापक’ म्हणून काम केले आहे. 1995 साली त्यांनी बंगालीत पहिले तृतीयपंथी-विषयक नियतकालिक अबोमनोब (शुभमन) सुरू केले. एक वेगळे व्यक्तिमत्त्व वाटयाला येऊनसुद्धा आपली वेगळी ओळख बनवणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी प्राचार्यांचे आत्मकथन.