Hrishikesh Mukherjee Bemisal Chitrapatanchi Khubsoorat Duniya ! | हृषिकेश मुखर्जी बेमिसाल चित्रपटांची खूबसूरत दुनिया !

Hrishikesh Mukherjee Bemisal Chitrapatanchi Khubsoorat Duniya ! | हृषिकेश मुखर्जी बेमिसाल चित्रपटांची खूबसूरत दुनिया !
हृषीदांचे चित्रपट व त्याचे रसग्रहण असे स्वरूप असलेले 'हृषीकेश मुखर्जी' हे पुस्तक जय अर्जुन सिंग यांनी लिहिले आहे. आनंद, गुड्डी, चुपके चुपके, अभिमान, असे चित्रपट आठवले की हृषीकेश मुखर्जी यांचे नाव येते. हृषीदांचे चित्रपट व त्याचे रसग्रहण असे स्वरूप असलेले हृषीदांच्या गाजलेले चित्रपटांचा समावेश यात आहेच, पण 'मेम दीदी', 'मुसाफिर', अनुराधा', 'आलाप', असली-नकली' अशा तुलनेने कमी चर्चेत राहिलेल्या चित्रपटांबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे, असे स्पष्ट करीत लेखकाने हृषीकेश मुखर्जी यांच्या बेमिसाल चित्रपटांची खूबसुरत दुनियेची सफर घडविली आहे. हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटाबद्दल सांगतानाच त्यांचे जगणे, त्यांतील काही घटना, त्यांच्याबद्दलच्या अनेकांच्या आठवणीही यात कथन केल्या आहेत. याचा मराठी अनुवाद मानसी होळेहोन्नूर यांनी केला आहे.