Hum Dono : Gosht Dev Ani Goldiechi | हम दोनो : गोष्ट देव आणि गोल्डीची
Hum Dono : Gosht Dev Ani Goldiechi | हम दोनो : गोष्ट देव आणि गोल्डीची
भारतीय सिनेमामधल्या दोन महान हस्तींना केलेला सलाम.
भाऊ आणि सर्जनशील सहकारी, देव आनंद आणि विजय आनंद यांनी सातत्याने एकमेकांमधल्या सर्वोत्तम गुणांना साद घातली. "हम दोनो' या पुस्तकामध्ये कलावंत म्हणून त्यांच्यात असलेलं कौशल्य रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. या दोघांनी आपल्याला 'नौ दो ग्यारह' (१९५७) पासून ते (१९६५) आणि 'तेरे मेरे सपने' (१९७१) पर्यंत अविस्मरणीय सिनेमे दिले. मुख्य प्रवाहातल्या या मौलाचा दगड बनलेल्या भारतीय सिनेमांची ही केवळ पुनर्भेट नाही, तर देव आणि गोल्डी यांच्या एकत्र येण्यातून, सर्जनशील सहकार्यातून बनलेल्या या सिनेमांचं विश्लेषणही आहे.
देव आनंदच्या मुख्य सहाय्यक म्हणून तनुजा चतुर्वेदी यांनी काम केलंय. या काळात देव आनंदशी मोकळेपणाने मारलेल्या गप्पा, केलेला संवाद आणि स्वतः घेतलेले अनुभव यांद्वारे त्यांनी देव आणि गोल्डी यांच्यात असलेल्या खास बंधाचा वेध घेतलाय. यातून भाऊ म्हणून आणि सर्जनशील सहकारी म्हणून या दोघांनी उत्तोमोत्तम काम करण्यासाठी एकमेकांना कशी स्फूर्ती दिली, हे शोधण्याचा प्रयत्न केलाय.