I Dare | आय डेअर

I Dare | आय डेअर
या सुधारित आणि विस्तारित आवृत्तीत, नोकरशहा आणि अधिकारी यांनीच पोलीस-यंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळे कसे निर्माण केले, याचे तपशीलवार कथन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु तसे न करता त्या व्यक्तींनी बेदी यांची पोलीस कमिशनरपदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. या अडथळ्यांवर मात करत, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बेदी यांनी, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांसोबत काम न करण्याचे ठरवले. अशा लोकांसमोर मान तुकवायची नाही, असा त्यांनी निर्धार केला.प्रेरक, अंतर्दृष्टी देणारे आणि जागरूक करणारे कथन!