Idali Orchid Ani Mi ! | इडली ऑर्किड आणि मी !

Idali Orchid Ani Mi ! | इडली ऑर्किड आणि मी !
सत्कार, सम्राट, सुरुची... कामतांच्या या 'स'काराचा रसास्वाद न घेतलेला मुंबईकर विरळाच. अस्सल मुंबईकरांची रसना तृप्त करणार्या कामत कुटुंबातील एका शिलेदाराचं 'द ऑर्किड' हे इकोटेल प. द्रुतगती मार्गावरुन जाताना खुणावू लागलं ते त्याच्या मानांकित प्रतिमेमुळे. कामतांच्या खाल्ल्या मिठाला जागणार्या प्रत्येक मराठी मुंबईकराचा ऊर 'ऑर्किड'च्या यशाने भरुन येतो. आज मुंबईची 'स्कायलाइन' अनेक हॉटेलांनी व्यापलेली असताना वेगळ्या संकल्पनेवर आधारलेलं हॉटेल कामतांनी उभारलं कसं, साधा हॉटेलवाला ते पंचतारांकित इकोटेल हा प्रवास कसा झाला याबद्दल कुणालाही कुतूहल वाटावं. हे कुतूहल शमवणारं एक प्रांजळ आत्मकथन 'इडली, ऑर्किड आणि मी!'च्या रुपाने साकारलं आहे.