If A Mind Bending New Way Of Looking At Big Ideas And Numbers | इफ् महान कल्पना आणि आकड्यांकडे बघण्याचा मनाला थक्क करणारा नवीन विचार

If A Mind Bending New Way Of Looking At Big Ideas And Numbers | इफ् महान कल्पना आणि आकड्यांकडे बघण्याचा मनाला थक्क करणारा नवीन विचार
पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा साडेतीन अब्ज वर्षांचा अवधी हा एका तासात दाखवायचा आहे अशी कल्पना करा. तसे केले तर ५६ मिनिटांपर्यंत डायनोसॉर दिसणार नाहीत पण दिसू लागल्यावर अवघ्या तीन मिनिटांत ते नष्टही झालेले असतील. आपण म्हणजे आधुनिक मानव अगदी शेवटी दृष्टिक्षेपात येऊ. शेवटी- शेवटी म्हणजे तास संपायला अवघे ०.२ सेकंद उरले असताना. या पुस्तकात “इफ द वर्ल्ड इज अ ह्यूज व्हिलेज” या प्रचंड खप झालेल्या पुस्तकाचे लेखक डेव्हिड जे. स्मिथ यांनी कल्पना करायला अवघड अशा प्रचंड आकारांची माहिती दिली आहे. पृथ्वीचा इतिहास, आपली सूर्यमाला आणि आकाशगंगा एवढी या विषयाची व्याप्ती असून, त्याची मांडणी चकित करणारी आहे.