IIT BIT | आय आय टी बी आय टी

Sukanya Patil | सुकन्या पाटील
Regular price Rs. 252.00
Sale price Rs. 252.00 Regular price Rs. 280.00
Unit price
IIT BIT ( आय आय टी  बी आय टी ) by Sukanya Patil ( सुकन्या पाटील )

IIT BIT | आय आय टी बी आय टी

About The Book
Book Details
Book Reviews

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात आयआयटी या संस्थेबद्दल अनेकांना कुतूहल वाटतं, आकर्षण वाटतं. "आपल्याला या संस्थेत शिकायला मिळावं किंवा आपला पाल्य या संस्थेत शिकून उच्चस्थानी जावा असं अनेक विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना वाटतं. याचं कारण तंत्रशिक्षण देणार्‍या जगभरातल्या नामवंत संस्थांमध्ये आपल्या देशातील आयआयटीजचा समावेश होतो. अर्थात प्रत्येक इच्छुकाला या संस्थेत प्रवेश मिळणं आणि तिथल्या शैक्षणिक वातावरणाचा अनुभव प्रत्यक्षात घेता येणं शक्य नाही. मात्र सुकन्या पाटील या एका आयआयटीअनने लिहिलेलं ‘आयआयटी-बीआयटी’ हे पुस्तक तुम्हाला हा अनुभव नक्कीच देईल. इतकंच नाही तर" "आयआयटीत प्रवेश का घ्यायचा? तो मिळवण्यासाठी काय तयारी करायची? अशा प्रश्‍नांच्या उत्तरांपासून तिथलं शैक्षणिक वातावरण शिक्षण देण्याची आणि घेण्याची पद्धत त्या पद्धतीचा भाग म्हणून राबवले जाणारे विविध उपक्रम त्या उपक्रमातून व्यापक होत जाणारा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आणि त्यातून पुढे सरकणारी इंजिनिअर होण्याची... " "आणि माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया या साऱ्या बाबीचं समग्र दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडेल. आयआयटी बॉम्बेमधील उत्साह वाढवणारे मूड इंडिगो टेक फेस्टसारखे विविध उपक्रम होस्टेल लाईफ शिक्षक-विद्यार्थी यांच्यामधील खेळीमेळीचं वातावरण यांच्या बारीक-सारीक नोंदी घेत सुकन्याने हे पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीनं लिहिलं आहे. त्यामुळे आयआयटीत जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि इतरांनीही हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे."

ISBN: 978-8-19-523500-1
Author Name: Sukanya Patil | सुकन्या पाटील
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 209
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products