Indian Home Rule Hind Swaraj | इंडियन होम रुल हिंद स्वराज

Indian Home Rule Hind Swaraj | इंडियन होम रुल हिंद स्वराज
१९०९ सालचे ‘हिंद स्वराज्य’ मूळ प्रकाशनानंतरच्या शतकात एक जागतिक महत्त्वाचे पुस्तक मानले गेले. या मूळ लेखनावर हिंदुस्थानात बंदी असल्याने मराठी अनुवाद बऱ्याच उशिरा प्रसिद्ध झाला.गांधींनी स्वतःच्या पुस्तकांपैकी इंग्रजीत अनुवाद केलेले हे एकच पुस्तक. ‘इंडियन होम रूल’ या अनुवादात त्यांनी काही महत्त्वाचे शब्द बदलले, ज्यामुळे या पुस्तकातील विचारांची चर्चा फार वेगळ्या पातळीवर होऊ लागली. या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद इतर भाषांत होणे आवश्यक होते..गांधी विचारांचे अभ्यासक रामदास भटकळ यांनी ‘हिंद स्वराज इंडियन होम रूल’चा मराठी अनुवाद पहिल्यांदाच उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी दिल्याने गांधीविचार मराठीतून समजून घ्यायला मदत होईल. ‘इंडियन होम रूल’ चे गांधी या लेखात गांधींच्या तत्कालीन विचारसरणीवर नव्याने प्रकाश पडला आहे. गांधी-नेहरू विसंवाद यासंबंधी काही महत्त्वाच्या पत्रांचा अनुवादही परिशिष्टात दिला आहे.