Indica | इंडिका

Indica | इंडिका
भारतीय उपखंडाचा पहिलावहिला निष्कर्षात्मक नैसर्गिक इतिहास "तुम्हाला माहित्ये का वेरूळची अप्रतिम लेणी ज्या खडकातून कोरून काढली आहेत तो खडक आत्तापर्यंत जगात घडून आलेल्या सर्वात मोठ्या लाव्हारसाच्या पुरातून निर्माण झाला आहे. ज्वालामुखीचा हा स्फोट एवढा प्रचंड होता की त्यांच्यामुळे डायनॉसॉरही नष्ट होऊ शकले असते हे माहिती आहे का तुम्हाला? आजच्या बंगळुरुचं आगळं वेगळं हवामान ८.८ कोटी वर्षांपूर्वी पृथीच्या पोटात घडून आलेल्या घडामोडींमुळेच निर्माण झालं आहे हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? एवढंच नव्हे तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा जवळजवळ २० टक्के जागतिक कार्बन अलग करतात आणि लाखो वर्षांपासूनच्या त्यांच्या गाळाने बंगालच्या उपसागराच्या ळाशी ग्रँड कॅनियनपेक्षाही मोठमोठ्या दऱ्या निर्माण केल्या आहेत हे ठाऊक आहे का तुम्हाला? तसंच राजासौरास नावाचा भारतीय प्रदेशातील डायनासॉर कदाचित टी रेक्सपेक्षाही भीषण होता हे कधी ऐकलंय का तुम्ही ? अशा कित्येक थक्क करणाऱ्या गोष्टी आणि शोध आहेत. उदाहरणार्थ मुंबईत ७ कोटी वर्षांपूर्वीची मगरीची अंडी सापडली आहेत तसंच डायनॉसॉरचं घरटी बांधण्याचं ठिकाण अहमदाबादजवळ होतं……. भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास सांगणाऱ्या ‘इंडिका’ चे हे सगळे भाग आहेत." "वेगवेगळ्या विज्ञानशाखांचं व्यापक संशोधन करताना वैज्ञानिकांसह देशभरात फिरून जीवरसायनशास्त्रज्ञ (बायोकेमिस्ट) प्रणय लाल यांनी भारताच्या गहन नैसर्गिक इतिहासाची पहिलीवहिली चित्तवेधक कहाणी शब्दबद्ध केली. सरपटणारे उग्र प्राणी मनोवेधक डायनॉसॉर अवाढव्य सस्तन प्राणी आणि आश्चर्यकारक वनस्पती हे सगळं सगळं या इतिहासात समाविष्ट आहे. या कहाणीत वेगवेगळ्या प्रतिमा उदाहरणं आणि नकाशांचा दुर्मीळ संग्रह आहे. ही कहाणी अगदी खूपच प्रारंभीपासून म्हणजे आकाशगंगेतील धूळ वेगाने गोलाकार फिरून एकसंध झाली आणि त्यातून आपला हा पृथ्वीग्रह निर्माण झाला तिथपासून सुरू होते आणि आपल्या पूर्वजांचं सिंधूच्या किनाऱ्यावर आगमन झालं तिथे येऊन संपते."