Internet Vaparatil Dhoke Talanyasathi | इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी

Internet Vaparatil Dhoke Talanyasathi | इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी
इंटरनेटचे विश्व अद्भुत, अमर्याद आहे. म्हणूनच या मायाजालाचे आकर्षण लहान मोठ्या सर्वानाच आहे. इंटरनेटचा वापर जसा वाढत आहे., तसा इंटरनेटशी संबधित गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ होत आहे; पण इंटरनेट हाताळताना भीती न बाळगता त्याचा सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत अतुल कहाते यांनी 'इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी (अर्थात सायबर सिक्युरिटी) मधून मार्गदर्शन केले आहे.चांगला पासवर्ड तयार करण्याची युक्ती, ऑनलाईन फसवणूक, त्याचे प्रकार, फिशिंग म्हणजे काय, व्हायरसपासून बचाव, फायरबॉल, अँटीव्हायरस, इंटरनेट कनेक्शनचे प्रकार, घातक सॉफ्टवेअर्सची तोंड ओळख, त्याचे आधुनिक रूप इंटरनेटवर फोटो आणि व्हिडिओ टाकण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, त्यातील धोके, इंटरनेटवरील व्यवहारांची सुरक्षितता , त्यावरील आर्थिक व्यवहार ही सर्व माहिती सोप्या भाषेत उदाहरणे व चित्रांसह यात दिली आहे.