Ishq @ Mandavi | इश्क @ मांडवी

Milind Mahangade | मिलिंद महांगडे
Regular price Rs. 261.00
Sale price Rs. 261.00 Regular price Rs. 290.00
Unit price
Ishq @ Mandavi ( इश्क @ मांडवी ) by Milind Mahangade ( मिलिंद महांगडे )

Ishq @ Mandavi | इश्क @ मांडवी

About The Book
Book Details
Book Reviews

कोकणातल्या सोनगिरी नावाच्या लहानशा गावात कनिष्ठ कर्मचारी म्हणून नेमणूक झालेला कथानायक मकरंद आपल्या समोर येतो. त्याच्या जोडीने आनंद आणि उमाकांत त्याच दिवशी त्याच कार्यालयात रुजू होतात. समवयस्क असल्याने तिघांची दोस्ती होते. अर्थात प्रत्येकाचा काहीतरी वेगळेपणा असतोच. लवकरच ते एकत्र राहू लागतात. आनंद जरा गंभीर तर उमाकांत थोडा फ्लर्ट आहे. मकरंदचं मांडवी गावातल्या एका मुसलमान तरुणीवर -आसमा तिचं नाव- प्रेम जडतं. तिचा मोठं भाऊ परदेशात राहतो. त्याची बायको मांडवीत असते. त्याच्या मित्रांकरवी त्याला जेंव्हा हे समजतं तेंव्हा तो आसमाला सक्त ताकीद देतो. प्रकरण पुढे वाढवायचं नाही अशी तंबी देतो. पुढे होतं असं की उमाकांत आणि ती भाभी यांचं अफेअर सुरू होतं. तो भाऊ अचानक परदेशातून येऊन उमाकांतवर खुनी हल्ला करतो. गोष्टीला विचित्र वळण लागतं. तर अशी ही कथा. मुंबईच्या रेल्वे PLATFORM वर सुरू होते आणि मडगावच्या फलाटावर येऊन थांबते.

ISBN: 978-9-39-547759-8
Author Name: Milind Mahangade | मिलिंद महांगडे
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 181
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products