Islam Dnyat Ani Adnyat | इस्लाम ज्ञात आणि अज्ञात

Islam Dnyat Ani Adnyat | इस्लाम ज्ञात आणि अज्ञात
आजच्या काळातच नव्हे तर नेहमीच अशा पुस्तकाची गरज होती. केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे. ज्यांनी या धर्माबद्दल बरीवाईट अशी काहीही मतं तयार केलेली नाहीत अशांनी त्यापूर्वी हे पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे. या पुस्तकातील विचार समजून घेण्याअगोदर वाचकाला आकर्षित करते ती लेखकाची मराठी भाषेवरील हुकूमत आणि त्याचा वापर. श्लोक, अध्याय असे शब्द वापरून त्यांनी भिन्नधर्मी वाचक आणि मुस्लीम लेखक यांच्यातील अंतर कमी केले आहे. त्यामुळे शब्दा शब्दाला न अडखळता आपण सरळ वाचत जातो. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचे सुलभीकरण केलंय. पण संज्ञा समजावून सांगताना त्यांचा आविर्भाव हा समोरच्याला यातले कळत नाही, संकल्पना फार अवघड आहेत बाबा, असे न वाटता सुरस भाषेत मध्यपूर्वेतील लोक, संस्कृती यांचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचक पुढे जात राहतात मध्येच सोडून देत नाही ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.