Itihasachya Paulkhuna Part 2 | इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २

Itihasachya Paulkhuna Part 2 | इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २
लेखक : कौस्तुभ कस्तुरे, विशाल खुळे, प्रणव महाजन, उमेश जोशी,योगेश गायकर, शिवराम कार्लेकर, रोहित पवार, सौरभ वैशंपायन, विद्याचरण पुरंदरे. इतिहास म्हटलं की मराठी माणसाला चटकन काय आठवतं ? अर्थातच मराठ्यांचा मध्ययुगीन इतिहास. पण गेली काही वर्ष या इतिहासाची निर्भत्सना होऊन मूळ इतिहास मागे पडत चालला होता. आणि म्हणूनच, आपल्या या दैदिप्यमान इतिहासाची आठवण रहावी याकरिता खारीचा वाटा उचलत काही अभ्यासकांच्या लेखण्या सरसावल्या, अन त्यातूनच जन्माला आला ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा एक साधार लेखसंग्रह ! पाऊलखुणाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आपल्यासमोर नविन माहिती आणि काही अपरिचित गोष्टींचा इतिहास समकालीन संदर्भांच्या आधारे या पाऊलखुणाच्या दुसर्या भागात मांडत आहोत. शाहजीराजांपासून मराठेशाहीच्या उत्तरार्धात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा साधार मागोवा म्हणजेच ‘इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग २’