Itihasachya Paulkhuna Part 3 | इतिहासाच्या पाऊलखुणा भाग ३

Itihasachya Paulkhuna Part 3 | इतिहासाच्या पाऊलखुणा भाग ३
मराठ्यांचा मध्ययुगीन इतिहास म्हणजे मराठी माणसाचा मानदंड. जगाच्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाएवढा शौर्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नीतिमत्तेचा इतिहास सापडणे जवळ जवळ अशक्य आहे. दुदैवाने या इतिहासाकडून प्रेरणा घेण्याएवजी त्याचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी होतो तेव्हा त्याच्या विकृतीकरणास सुरुवात होते. असा विकृत इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचणे हे आम्ही सामाजिक पातक मानतो. "हे विकृतीकरण रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ आणि २ मध्ये आम्ही केला आहेच आणि त्या प्रयत्नांना सुजाण अभ्यासू इतिहासप्रेमींचा उदंड प्रतिसादही मिळत आहे. या प्रतिसादाच्याच जोरावर नव्या दमाच्या लेखकांसह आणि नव्या विषयांसह घेऊन येत आहोत इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग ३."