Jagbharatale Dhatingan | जगभरातले धटिंगण

Jagbharatale Dhatingan | जगभरातले धटिंगण
ते लोकशाही मार्गाने सत्तेवर आले अन् हुकूमशहा बनले. "विधिमंडळात लोकनियुक्त प्रतिनिधी असतात. त्यांच्यात फूट पाडता येते. त्यांना विकत घेता येतं. त्यांना गप्प बसवता येतं. समजा सर्व विरोधी प्रतिनिधी एकत्र झाले तरीही बहुमत नसल्याने ठणाणा करण्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही. सत्ताधारी माणूस आणि पक्ष बेकायदा कृत्यं करतात भ्रष्टाचार करतात दंडेली करतात. विधिमंडळ त्यांना रोखू शकत नाही. पैसा कायदा आणि दंडुका यांचा वापर करून माध्यमांचे मालक आणि पत्रकार यांना अंकित करता येतं. ते जमलं की सत्ताधाऱ्याने काहीही केलं तरी ते खपतं. विधिमंडळ न्यायमंडळ माध्यमं ही सत्तेवर अंकुश ठेवणारी साधनं निष्प्रभ केली की सत्ताधारी बिनधास्त काहीही करू शकतो... लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊन लोकशाहीलाच पायदळी तुडवणाऱ्या निरंकुश सत्ताधाऱ्यांची ओळख पुस्तक."