Jai Hind Azad Hind | जय हिंद आजाद हिंद

Jai Hind Azad Hind | जय हिंद आजाद हिंद
२१ ऑक्टोबर १९९३ हा दिवस म्हणजे सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर येथे स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारचा सुवर्णमहोत्सवी स्मृतीदिन. त्यानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ही संस्मरणीय साहस गाथा जय हिंद आजाद हिंद या नावाने लेख मालेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली होती.हिंदुस्तान स्वतंत्र होईल आणि तोही लवकरच हे उद्गार सुभाषबाबूंनी १५ ऑगस्ट १९४५ या दिवशी काढले होते. बरोबर दोन वर्षांनी हिंदुस्तान स्वतंत्र झाला. एक स्वप्न प्रत्यक्षात उतरले. स्वातंत्र्य सिद्धीसाठी सर्वस्व समर्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बाबूंच्या साहस गाथा या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर येतात.