Jait Re Jait | जैत रे जैत

Jait Re Jait | जैत रे जैत
कर्नाळ्यावरचा दीडशे फूट उंचीचा उभा टेंबा मी पाहिला आणि थक्कित होऊन उभा राहिलो. अवघा सह्याद्रि मंडळात कडा नाही. मग दिसली ता कड्याभोवती चहूबाजूंनी लोंबलेली भली प्रचंड पोळी-आग्यामाश्यांची. त्या पोळ्यांचा मध कुधी काढू शकेल, यावर विश्वास बसत नाही. पण मग बसला. ठाकरवाडीत ठाकरांशी गप्पा मारीत असता त्यांनी जे सांगितले, ते ऐकून आपण तर बुवा तोंडात बोट घातले! अशा अवघड ठिकाणाचा मधही ठाकरगडी काढतात! धन्य त्यांची माय त्यांना प्रसवली. मस्तकात वारे भिरभिरू लागले. गेला चारसहा वर्षात कर्नाळ्यावर चारपाचदा जाऊन आलो. अनेकदा तिथे रात्रीचा मुक्काम केला, खाली तळात वाघरू डुरकत होते. आगटीजवळ मी अन् नाग्या ठाकर शेकत होतो. शेकता शेकता नागाला गोष्ट सांगू लागलो. नाग्या असा काही हरिखला! ती तर त्याच्या घरचीच गोष्ट होती! नाग्या ठाकर हा माझा गोष्टीचा पहिला श्रोता. बरेच दिवस गोष्ट डोकात घुमत होती.