Jamba Bamba Bu Ani Itar Balnatye : Goshta Simple Pillachi |जम्बा बम्बा बू आणि इतर बालनाट्ये : गोष्ट सिम्पल पिल्लाची
Jamba Bamba Bu Ani Itar Balnatye : Goshta Simple Pillachi |जम्बा बम्बा बू आणि इतर बालनाट्ये : गोष्ट सिम्पल पिल्लाची
जम्बा बम्बा बू आणि इतर बालनाट्ये या पुस्तकात एकुण ३ बालनाटयांचा संग्रह आहे . हि तीनही बालनाट्ये सर्वसामान्य संकल्पनेहून वेगळी आहेत .'' ग्रिप्स थिएटर '' या जर्मन संस्थेच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन या नाटकांचे लेखन केले आहे . या नाटकांचे महत्वाचे विशेष म्हणजे - मुलांचे भरपूर मनोरंजन , अवास्तव अन भ्रामक गोष्टी , अंधश्रद्धांना फाटा ( उदा. जादूटोणा , भुताटकी इ. ) , मुलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांची हाताळणी. मुलांना पोरकट , निर्बुद्ध , खुळचट न समाजता त्यांच्या मानसिकतेचा योग्य सन्मान आणि मनोरंजनाद्वारे मुलांच्या मानसिक पोषणाचा समाजाभिमुख विचार. "'गोष्ट सिम्पल पिल्लाची ' या नाट्यातील सावळी चष्मावाली आणि लौकिकअर्थानी सौंदर्याच्या व्याख्येत न बसणारी सावनी दर सुट्टीत" आपल्या आजोळी राहायला येते. सावनी हुशार आहे पण तिच्या पर्यावरणवादी चळवळीत काम "करणाऱ्या आईबाबांनी तिला अभ्यास परीक्षा मार्क ग्रेड्स अशा बंधनात न अडकवता नैसर्गिक" "पद्धतीनी शिकवलं आहे. तिची टक्केवारी सामान्य असली तरी तिला ज्या गोष्टी करता येतात " माहीत असतात त्या कुणालाच माहीत नसतात. पण तिचं हे वेगळेपण तिच्या आजोळी "कुणालाच समजत नाही. आणि रूढ अर्थानी गोरी सुंदर हुशार आणि गुणी असलेली तिची" मामेबहीण सिया तिला सतत तिच्या वेगळेपणाची जाणिव करून देत असते. त्या दोघींची आजीही तिच्या नकळत त्यांच्यात तुलना करत असते आणि सावनीला डावी ठरवत असते. ह्या तुलनेमुळे सावनीलाही आपल्यात काहीतरी कमी आहे असं वाटायला लागतं. सोसायटीच्या एका कार्यक्रमासाठी आजी नाटक बसवत असते. त्या तालमींमध्ये सावनीच्या मनातला हा न्यूनगंड टोकाला जातो. शेजारी राहणारा झुमरू काका म्हणजे झुमका तिला त्यातून बाहेर काढायचा खूप प्रयत्न करतो पण घटनाच अशा घडत जातात की सावनी तिच्या कोशात जाते. प्रयोगाच्या एकच दिवस आधी मुख्य भूमिका करणाऱ्या सियाचा पाय मोडतो. झुमका सावनीला ती भूमिका करायला मनवतो. आत्मविश्वास नसलेली सावनी झुमकासाठी तयार होते. स्टेजवर स्पॉटसमोर उभ्या राहिलेल्या सावनीला असा एक क्षण मिळतो ज्यात ती स्वतःला ओळखते आणि अप्रतिम सुंदर काम करते. सगळे तिचं प्रचंड कौतुक करतात. सियाला आणि आजीला त्यांची "चूक समजते. सौदर्य हे नाक डोळे आणि रंग ह्यात नसतं आपल्या आतल्या चांगुलपणात " गुणात आणि आत्मविश्वासात असतं ह्याची जाणीव मोठे आणि लहान सगळ्यांनाच होते.