Jamba Bamba Bu Ani Itar Balnatye : Jamba Bamba Bu |जम्बा बम्बा बू आणि इतर बालनाट्ये : जम्बा बम्बा बू
Jamba Bamba Bu Ani Itar Balnatye : Jamba Bamba Bu |जम्बा बम्बा बू आणि इतर बालनाट्ये : जम्बा बम्बा बू
जम्बा बम्बा बू आणि इतर बालनाट्ये या पुस्तकात एकुण ३ बालनाटयांचा संग्रह आहे . हि तीनही बालनाट्ये सर्वसामान्य संकल्पनेहून वेगळी आहेत .'' ग्रिप्स थिएटर '' या जर्मन संस्थेच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन या नाटकांचे लेखन केले आहे . या नाटकांचे महत्वाचे विशेष म्हणजे - मुलांचे भरपूर मनोरंजन , अवास्तव अन भ्रामक गोष्टी , अंधश्रद्धांना फाटा ( उदा. जादूटोणा , भुताटकी इ. ) , मुलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांची हाताळणी. मुलांना पोरकट , निर्बुद्ध , खुळचट न समाजता त्यांच्या मानसिकतेचा योग्य सन्मान आणि मनोरंजनाद्वारे मुलांच्या मानसिक पोषणाचा समाजाभिमुख विचार. 'जम्बा बम्बा बू ' या नाट्यात जंगल बुकमधला मोगली बघीरा आणि बालूबरोबर शहरात येतो. बघीराचं म्हणणं असतं की "मोगली माणूस म्हणजे जंगलाच्या भाषेत ‘जम्बा बम्बा बू’ आहे त्यामुळे त्यानी इतर" माणसाच्या मुलांसारखं शाळेत जाऊन शिकायला हवं. मोगलीला सुरवातीला हे मुळीच मान्य नसतं. पण शाळेच्या बाहेर त्याला काही मुलं भेटतात. अभ्यास बोअर असला तरी शाळेत किती धमाल असते हे ती मुलं त्याला पटवून देतात. मोगली शाळेत जायला तयार होतो. पण "शाळेच्या फॉर्ममध्ये नाव पत्ता ह्यासोबत ‘धर्म’ कोणता हे लिहिणं अनिवार्य असतं. धर्म" "म्हणजे काय हेच माहीत नसलेला मोगली त्याबद्दल जाणून घेण्यासाठी शाळेतल्या हिंदू " "मुसलमान आणि ख्रिश्चन ह्या तीन धर्मातल्या मुलांच्या घरी जातो. ह्या तीनही घरी देव धर्म" "आणि रूढी परंपरा ह्यात अडकून पडलेल्या मोठ्या माणसांमुळे मोगलीवर उपाशी राहण्याची" वेळ येते. माणसाचं हे रूप सहन न झालेला मोगली जंगलात परत जायचं ठरवतो. इतक्यात मुसळधार पाऊस सुरु होतो. हळूहळू पाणी वाढू लागतं. शाळेला गेलेले त्याचे दोस्त अडकून "पडतात. त्यांना वाचवायला मोगली शाळेकडे धाव घेतो. तिकडे त्याला तीच मोठी माणसं धर्म " जात-पात विसरून एकमेकांना मदत करताना दिसतात. ह्यामुळे माणसातलं माणूसपण अजूनही शिल्लक आहे हे त्याला दिसतं. मोठ्यांनाही त्यांची चूक लक्षात येते. कुठल्याही धर्मापेक्षा ‘माणूस’ हा धर्म मोठा असतो हे त्यांना जाणवतं. मोगली आणि त्याचे मित्र नकळत मोठ्यांना त्यांच्या आतल्या माणुसकीची जाणिव करून देतात. मुलं आपापले शाळेचे फॉर्म पुन्हा "भरायचं ठरवतात. आणि धर्म ह्या रकान्यात लिहितात ‘जम्बा बम्बा बू’"