Jamba Bamba Bu Ani Itar Balnatye : Tu Dost Mahya |जम्बा बम्बा बू आणि इत्तर बालनाट्ये : तू दोस्त माह्या
Jamba Bamba Bu Ani Itar Balnatye : Tu Dost Mahya |जम्बा बम्बा बू आणि इत्तर बालनाट्ये : तू दोस्त माह्या
जम्बा बम्बा बू आणि इतर बालनाट्ये या पुस्तकात एकुण ३ बालनाटयांचा संग्रह आहे . हि तीनही बालनाट्ये सर्वसामान्य संकल्पनेहून वेगळी आहेत .'' ग्रिप्स थिएटर '' या जर्मन संस्थेच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन या नाटकांचे लेखन केले आहे . या नाटकांचे महत्वाचे विशेष म्हणजे - मुलांचे भरपूर मनोरंजन , अवास्तव अन भ्रामक गोष्टी , अंधश्रद्धांना फाटा ( उदा. जादूटोणा , भुताटकी इ. ) , मुलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांची हाताळणी. मुलांना पोरकट , निर्बुद्ध , खुळचट न समाजता त्यांच्या मानसिकतेचा योग्य सन्मान आणि मनोरंजनाद्वारे मुलांच्या मानसिक पोषणाचा समाजाभिमुख विचार. 'तू माह्या दोस्त' या नाट्यातील तन्वी पुण्यात आपल्या आई बाबांबरोबर राहते. तिचे मम्मी आणि पप्पा दोघंही नोकरी करतात. त्यामुळे दहा वर्षांची तन्वी शाळेतून आली की किल्लीनी दार उघडून घरात येत असते आणि दिवसभर एकटी असते. ती तिच्या आईबाबांची खूप लाडकी असते. तिला हवं ते सगळं मिळतं. पण तिचा एकच प्रॉब्लेम असतो. ती दिवसभर एकटी असते. तन्वी त्यातून मार्ग काढते . तिचं स्वतःचं एक कल्पनेचं जग तयार करते . त्यात तिचे मित्र असतात जे तिचं सगळं ऐकतात आणि तिच्याशी खेळतात. त्यांच्याशी ती गप्पा मारते. पण आईबाबांना वाटतं तिला काहीतरी मानसिक आजार आहे. एकट्या पडलेल्या तन्वीच्या आयुष्यात तिचा चुलत भाऊ रघू अचानक एखाद्या धुमकेतूसारखा येतो. रघू विदर्भातल्या बुट्टीबोरी नावाच्या छोट्याश्या गावात राहत असतो. एका अपघातात त्याचे आईवडील देवाकडे जातात. पोरक्या "झालेल्या रघूला त्याचा काका म्हणजे तन्वीचा पप्पा घरी घेऊन येतो. वेगळ्या दिसणाऱ्या " वेगळं मराठी बोलणाऱ्या रघूला तन्वी लगेच स्वीकारत नाही. पण कल्पनेच्या जगातल्या मित्रांशी खेळण्याची सवय रघूलाही असते. त्यामुळेच दोघांची गट्टी जमते. दोघांच्या आयुष्यातला एकटेपणा नाहीसा होतो आणि दोघांना हक्काचा दोस्त मिळतो. तन्वीच्या शहरी "मम्मीला मात्र हे रुचत नाही. त्याच्या सवयी भाषा ह्याचा वाईट परिणाम आपल्या मुलीवर" होईल अशी तिला भीती असते. तिच्या आग्रहानुसार रघूची रवानगी हॉस्टेलला करण्याचं ठरतं. पण ह्यावेळी तन्वी बंड पुकारते. शेवटी दोघांच्या दोस्तीपुढे मम्मीला हार मानावी लागते. तन्वी आणि रघू सख्ख्या भावंडांप्रमाणे एकत्र राहू लागतात.