Janache Anubhav Pusata | जनाचे अनुभव पुसतां

Janache Anubhav Pusata | जनाचे अनुभव पुसतां
मुख्य विषयाशी संबंधित असलेल्या सर्व प्रश्नांचा बोकील धांडोळा घेतात. प्रत्येक बाजू न्याहाळतात, तिची मुळे शोधून काढतात आणि तिचे परिणाम अजमावतात. अवश्य तर इतिहास, पुरातत्वविद्या, मानवशास्त्र यांच्याकडे जातात. सामाजिकांचे सूक्ष्म पदर उलगडून दाखवतात. अशा प्रकारे प्रत्येक विषयाचा विलक्षण गंभीरपणे, सूक्ष्मपणे आणि साक्षेपाने केलेला अभ्यास त्यांच्या लेखांच्या पानापानांतून दृग्गोचर होतो. प्रत्येक लेख दीर्घ असूनही त्यात फापटपसारा कुठेही दिसणार नाही त्यातला प्रत्येक मुद्दा कोणत्या ना कोणत्या संदर्भात महत्त्वाचा असतो. आणि या समग्र अवलोकन करणार्या दृष्टीमुळे प्रत्येक संशोधनलेख हे एक 'कथानक' होते. काही ठिकाणी तर ते चित्रपटाच्या कथानकासारखे मनावर ठसते