Jankalyanakari Raja Shivray | जनकल्याणकारी राजा शिवराय

Jankalyanakari Raja Shivray | जनकल्याणकारी राजा शिवराय
शिवाजी राजे हे १७ व्या शतकातील जनतेचे हित जोपासणारे सर्वगुणसंपन्न असे आदर्श राजे होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात जनसामान्य रयतेच्या कल्याणासाठीच आपले जीवन समर्पित केले. ज्ञानवंत, बुध्दिवंत, गुणवंत व राजकारण धुरंधर असा शूर व पराक्रमी राजा मध्ययुगात दुसरा कोणी झाला नाही. धाडस, शौर्य व चातुर्य हे गुण त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे स्थायीभाव होते. त्यांनी दलित, पीडित व दुर्बलांना योग्य न्याय देण्याचे महान कार्य केले.स्त्रियांना माता भगिनीप्रमाणे वागविले व त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. असा थोर नीतिमान राजा समाजातील सर्व लोकांना वंदनीय वाटतो. शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना वंदनीय वाटतो. शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेने वागविले व त्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले.