Jay Baba Felunath | जय बाबा फेलूनाथ
Jay Baba Felunath | जय बाबा फेलूनाथ
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांनी बंगालीत गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्याह गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्याी कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित राय यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक नीलिमा भावे यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्यान केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!