Jethe Jato Tethe | जेथे जातो तेथे

Jethe Jato Tethe | जेथे जातो तेथे
कै. डब्ल्यु. आर. उर्फ नानासाहेब तळवलकर यांचे आत्मचरित्र... नियतीने नानासारख्या सरळ स्वभावाच्या माणसाच्या जीवनात भरभरून नाट्य ओतले. त्या सर्व संघर्षात आणि यशापयशांत नानांची वृत्ती सदैव निरागस राहिली. माणसाच्या आणि जीवनाच्या चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास अभंग राहिला. ‘जेथे जातो तेथे’ मला चांगली माणसेच सांगाती लाभली आणि म्हणून आपणाला जीवनांत यश मिळत गेले असे नानांचे सूत्र असे.व्यक्तिगत जीवनांत, नानांच्या दुसऱ्या, जर्मन पत्नीने भारतात येऊन केवळ नानांनाच भक्कम आधार दिला नाही तर राष्ट्रीय चळवळीतही त्या सहभागी झाल्या. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर, प्रथम पत्नीबरोबर नानांचा 40 वर्षे फेर संसार झाला. या संपूर्ण काळांत नाना आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी झटत राहिले.अशा एका साध्या माणसाची ही अद्भुत, रोमहर्षक आत्मकथा !