Jidnyasa | जिज्ञासा

Jidnyasa | जिज्ञासा
प्रकाशन व्यवसायाचा स्वीकार मला विश्वविद्यालयासारखा करता आला. ग्रंथकर्मीसोबत मी ज्ञान आणि कला यांच्या निरनिराळ्या उपवनांत संचार करू शकलो. त्यांची विद्वत्ता, प्रतिभा आणि साधना दिपवून टाकणारी असली तरी त्यांच्या स्नेहशीलतेमुळे त्यांच्यात रममाण होणं सहजसाध्य झालं. ‘जिगसॉ’, ‘जिव्हाळा’ आणि आता ‘जिज्ञासा’ या माझ्या तीन नातेचित्रांच्या संग्रहांतून ह्या विहाराचा अनुभव मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची थोरवी सांगत असताना मी कसा घडत आहे, मी किती भाग्यवान याची पदोपदी जाणीव होते. अजून कितीतरी जणांनी माझं आयुष्य समृद्ध केलं आहे. त्यांची फक्त नावं घेतली तरी छाती दडपून जाते आणि कितीही जिज्ञासा बाळगली तरी, किती राहून गेलं आहे ते लक्षात येतं. दामोदर धर्मानंद कोसंबी, गोविंद सदाशिव घुर्ये, अक्षयकुमार देसाई, अरुण टिकेकर, बाबा आमटे, व्हर्गीस कूरियन, गणेश त्र्यंबक देशपांडे, चिदानंद नगरकर, श्रीराम लागू यांचं बोट धरून केलेली ही जीवनसफर.