Jienchya Ramalkhuna | जीएंच्या रमलखुणा

Jienchya Ramalkhuna | जीएंच्या रमलखुणा
'चित्रकलेत 'अशक्यप्राय त्रिकोण' या नावाची एक संकल्पना आहे. या त्रिकोणाचा आकार भल्याभल्यांना कोड्यात टाकणारा आहे. या त्रिकोणाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ कागदावरच असू शकतो. प्रत्यक्षात कुणी असा त्रिमिती त्रिकोण तयार करू शकत नाही. श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी हे उत्तम चित्रेही काढत आणि चित्रकलेचा त्यांचा सखोल अभ्यास देखील होता. त्यांना 'अशक्यप्राय त्रिकोण' ही संकल्पना माहीत असावी. त्यांच्या कथा वाचताना जाणवते की आयुष्याचा अर्थ शोधताना त्यांच्या हाती जे बिंदू लागले, त्यांच्यापासून ते असे अशक्यप्राय त्रिकोण' तयार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना हेही ठाऊक असते की असे त्रिकोण फक्त कागदावरच मांडता येतात...या त्रिकोणांमागे दडलेले बिंदू आणि ते सुचवीत असलेल्या रमलखुणा शोधण्याचा सुप्रसिद्ध ललित लेखक आणि जागतिक कथासाहित्याचे अभ्यासक विजय पाडळकर यांचा हा प्रयत्न. 'जीएं'च्या निवडक कथांच्या रसग्रहणाचा एक अनोखा कॅलिडोस्कोप.