Jingani | जिनगानी

Jingani | जिनगानी
मानवी आयुष्यातील सुख-दु:खाचा वास्तव पातळीवर वेध घेणार्या कथा. आपण जगत जातो, जगत राहतो, पण जगणं कुठं आपल्या हातात असतं ? जगणं नेईल तसे आपण वाहत राहतो. आपल्याला जगण्यातून सुखी व्हायचं असतं, पण दु:ख येतातच जगण्यात आडवी. जगात कुणालाच नुसतं सुखी किंवा दु:खी होता येत नाही. दु:खाशिवाय सुख नसतं न सुखाशिवाय दु:ख नसतं. एकमेकांशिवाय ते एकमेक ओळखूच येत नाहीत. पण काय सुख आणि काय दु:ख हे मात्र प्रत्येक माणसाचं स्वत:वर अवलंबून असतं. कुणाला सुखाचं दु:ख वाटू शकतं तर कुणाला दु:खाचं सुख वाटू शकतं. त्यातून मग अंतिमत: सुख आणि दु:ख यालाच तर जिनगानी म्हणायचं !राजन खान लिखित 'जिनगानी' या कादंबरी मध्ये हेच मर्म लेखक सांगत आहे.