Kadambarimay Shivkal | कादंबरीमय शिवकाल

Kadambarimay Shivkal | कादंबरीमय शिवकाल
कै. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हे एक प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. त्यांचे इतिहासप्रेम, शिवाजी महाराज आणि दुर्गांवरील प्रेम, शिवभूमीतील भटकंती या सगळ्यांतून साकारलेला सामाजिक - भौगोलिक - सांस्कृतिक इतिहास यांची त्यांना खोल जाणीव होती. त्यांच्या चिंतन, मनन आणि लेखनात रामायण, महाभारत, शिवायन, संतसाहित्य, ग्रामीण संस्कृती प्रकर्षाने आलेली दिसून येते. पुराणसरणीच्या बखरींच्या अभ्यासमाध्यमातून दाण्डेकरांच्या शिवकालखंडाविषयीच्या प्रतिक्रिया त्यांच्या पाचही कादंबऱ्यांतून उमटलेल्या दिसतात. "गोनीदांनी १९६६ ते ७४ या काळात शिवकालावर आधारित ज्या पाच कादंबर्या साकारल्या त्या एकाच संचात आता उपलब्ध झाल्या आहेत .'बया दार उघड' 'हर हर महादेव' 'झुंजार माची' 'दर्याभवानी' आणि 'हे तो श्रींची इच्छा या त्या पाच कादंबऱ्या. अंधारयुगातील उद्धवस्त समाजापासून शिवराज्याभिषेकापर्यंत महाराष्ट्रीय उत्थानाचं भव्यदिव्य चित्रण या मध्ये करण्यात आले आहे. प्रस्तावनेत श्री. बाबासाहेब पुरंदेरे यांनी म्हटले आहे ' शिवकालीन समाजस्थिती या कादंबिरीची नायिका आहे आणि शिवकालीन इतिहास हा त्याचा नायक आहे '. पाचही कादंबऱ्यामध्ये त्या त्या परिसरामधील भाषा चालीरीती यांचे चपखल चित्रण केले आहे."