Kahani Kusumagrajanchi | कहाणी कुसुमाग्रजांची

Kahani Kusumagrajanchi | कहाणी कुसुमाग्रजांची
प्रत्येक मराठी वाचकाला परिचित असलेले नाव म्हणजे वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज. जवळ जवळ सात दशके त्यांनी सातत्याने लेखन केले. कविता आणि नाटके ही त्यांची मुख्य साहित्यिक कर्तृत्वाची क्षेत्रे ठरली. त्यामध्ये 'नटसम्राट' आणि 'विशाखा' हे मानदंड ठरले. "अशा या अनोख्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचे महत्त्वाचे काम त्यांचे निकटवर्तीय श्री. शं. सराफ यांनी 'कहाणी कुसुमाग्रजांची' या चरित्रग्रंथात केले आहे. स्वत: तात्यासाहेब शिरवाडकरांनी आपली पत्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली होती. तसेच सराफ यांनी चौकस वृत्तीने शिरवाडकरांचे कुटुंबीय संपादक प्रकाशक नाट्यनिर्माते त्यांनी निर्माण केलेल्या संस्था यांच्याशी असलेल्या संबंधांचा आलेख काढून या चरित्रग्रंथाला पूर्णत्व दिले आहे त्यामुळे या ग्रंथाला एक प्रकारे अधिकृतता प्राप्त झाली आहे. त्यामुळे ही Authorised Biographyच म्हणता येईल."