Kahani Pabalchya Vidnyan Ashramachi | कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची

Kahani Pabalchya Vidnyan Ashramachi | कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची
विज्ञान आश्रम पुणे जिल्ह्यातील पाबळ गावातील एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग हे या संस्थेचे संस्थापक आहे. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून पाबळ हे खेडे निवडले आणि येथे हा आश्रम सुरू झाला. पुढे इथेच खऱ्या शिक्षणाचा इतिहास घडला. आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनतात. समाजासमोरच्या समस्यांना शिक्षण - तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भिडत ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या प्रयोगाची हि गोष्ट.