Kahanimagachi Kahani | कहाणीमागची कहाणी

Kahanimagachi Kahani | कहाणीमागची कहाणी
सिद्धहस्त लेखक गो. नी. दांडेकर यांनी विपुल लेखन केले होते. त्यांची लेखनामागची प्रेरणा काय होती, पुस्तकातील नायिका त्यांना कुठे भेटल्या, भाषेचा विचार ते कसे करायचे ते समजून घेणे त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. या लेखसंग्रहातून वाचकांची ही अपेक्षा पूर्ण होते. मी लेखक कसा झालो?, पहिले नाटक, पहिले पुस्तक या संबंधातील माहिती गो. नि. दांडेकर यांनीच लिहिलेल्या लेखांमधून होते. "'शितू ' मधील कोकण यातून भेटते पडघवली पूर्णामायची लेकरं जैत रे जैत कुणा एकाची भ्रमणगाथा मृण्मयी बखर शिवकालाची या लेखांमधून त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या निर्मिलेली पात्रे भेटतात. अखेरीस त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पाही वाचता येतात."