Kajalmaya | काजळमाया

Kajalmaya | काजळमाया
जी. ए. कुलकर्णी यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेला हा कथासंग्रह. प्रदक्षिणा, अंजन, शेवटचे हिरवे पान, स्वप्न, दूत, वंश, ठिपका, कसाब, भोवरा, गुलाम, कळसुत्र, पुनरपि, रत्न, विदुषक या १४ कथांतून एक रहस्यमय विश्व समोर येतं. या विश्वात जे काही घडत असतं, ते सगळं कालातीत. कोडं सोडवायला जावं, तर त्यात अधिकच गुंतण होतं. कधी न सुटणारी कोडी, कधी न उलगडणारी आयुष्य, अनाकलनीयाचा वेध घेण्याची धडपड. प्रतिक आणि घटनाप्रधान. ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुळकर्णी लिहितात, 'जी. एं.च्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सुक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात.