Kalakruti Ani Samiksha | कलाकृती आणि समीक्षा

Kalakruti Ani Samiksha | कलाकृती आणि समीक्षा
ज्ञानदृष्टी आणि सौंदर्यदृष्टी यांची उत्कृष्ट सांगड घालून समीक्षेची नवी रूपे सिद्ध करणाऱ्या मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक गंगाधर पाटील यांच्या गेली चाळीस वर्षे नियतकालिकात विखरुन राहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे.सदर पुस्तकाची विभागणी तीन भागात केली आहे पहिला भागात लिओनार्दो दा विंचीच्या भावविश्वाचा शोध आरंभीच्या लेखात घेण्यात आला आहे. दुसऱ्या भागात कविवर्य पु .शि .रेगे यांच्या कविता तील आदिबंधात्मक भावविश्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तिसऱ्या भागात कवितेची समीक्षा करण्याची एक दिशा केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, इंदिरा संत यांच्या कवितेच्या आधारे दाखवली आहे.