Kalatit Vyavsthapan Tattve | कालातीत व्यवस्थापन तत्त्वे

Kalatit Vyavsthapan Tattve | कालातीत व्यवस्थापन तत्त्वे
छत्रपती शिवाजी महाराजचरित्र आणि शिकवण मानवजातीच्या इतिहासात त्यांनी असामान्य कामगिरी करून आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. इतिहासात विशेष रस नसणार्या, तसेच वाचनाची आवड नसणार्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल औत्सुक्य असणार्या असंख्य भारतीय व अभारतीय, तसेच किशोरवयातील मुलामुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासाला धरून संक्षिप्त चरित्र असणे अगत्याचे होते. त्याचबरोबर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कार्य व कारकिर्दीतून बर्याच गोष्टी शिकण्यासारख्या, शिकवण्यासारख्या आहेत. , परिश्रम, चारित्र्य, देशप्रेम, नेतृत्वगुण इत्यादी गुणांची, मूल्यांची त्यांना ओळख व्हावी, जाण व्हावी व त्याद्वारे प्रेरित होऊन त्यांना चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशाने सदर पुस्तकाची मांंडणी केली आहे.