Kale Rahasya | काळे रहस्य

Kale Rahasya | काळे रहस्य
रहस्य कथांचा बाज वेगवेगळा असला, तरी त्या मागे दडलेले सत्य बाहेर येईपर्यंत वाचकांची उत्सुकता ताणलेली असते. मकरंद साठे यांच्या 'काळे रहस्य' या कादंबरीतील रहस्यमयता वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. सुरवातीला महाराष्ट्रा पोलिस सेवेतील 'आयएएस' श्रेणीतील अधिकारी विद्याधर गोडबोले यांच्या ओळखीने सुरवात होते. कामाप्रती दक्ष असलेला विद्याधर घरी नातेवाईकांबरोबर ब्रिजचा डाव खेळतानाचं अभिनेत्री वसुंधरा पाटील हिच्या खुनाची बातमी समजते. अजित देवधरची हा लेखक आपणच खून केल्याची कबुली पोलिसांकडे येऊन देतो. विद्याधर वरिष्ठ पोलिस निरीक्षक खोब्रागडे याच्या ठाण्यात जाऊन अजितची चौकशी सुरु करतो. तेथूनच गुढतेची डूब कथेबरोबर उत्कंठा वाढविते. अजितचे विचित्र वागणे, बाबुला पकडणे व त्यातून गुन्ह्याचा तपास कसा होतो हे वाचनीय झाले आहे. मानवी व्यवहाराचा, सामाजिक स्थिती, सांस्कृतिक घडामोडी यांचा अनुभव यातून मिळतो.